Breaking News

‘पालीवाला’त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

पाली ः प्रतिनिधी

ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन राष्ट्रसेवा करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या उदात्त  हेतूने पालीवाला महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांच्या प्रयत्नातून नुकताच पालीवाला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय नोकरीसंदर्भात योग्य मार्गदर्शन या केंद्रात मिळणार आहे. या कार्यक्रमास पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर, मंत्रालय कक्ष अधिकारी भाग्यश्री वढारे, सुधागड तालुक्यातील महागाव गावाचे सुपुत्र व विक्रीकर निरीक्षक सागर कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एम. एस लिमण, प्रा. डॉ. एम. ए. सोहनी, प्रा. डॉ. अंजली पुरानिक व इतर प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी प्रा. मानसिंग लिमण, प्रा. अंकुश सोहनी व प्रा. संतोष भोईर यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लिमण यांनी केले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply