पनवेल : वार्ताहर
पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग सुक्या मच्छीला अधिक पसंती देतात. यामुळे सुकट, मांदेली, बारीक जवळा, अंबाडी, वाकटी माकली, ढोमकी, बोंबील, बांगडा यांची मागणी वाढली असून, ही सर्व सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper