Breaking News

‘पीएमपीएमएल’ पुन्हा सुरू करा; भाजपचे आंदोलन

खासदार गिरीश बापटपोलिसांच्या ताब्यात

पुणे : प्रतिनिधी

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंटसह पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचेही जाहीर केले, मात्र भाजपने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी गिरीश बापट आणि जगदीश मुळीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करा या मागणीसाठी गिरीश बापट यांनी वायरलेस व्हॅनमध्ये बसून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन-तीन गोष्टींना आमचा विरोध आहे, पहिली गोष्ट म्हणजे पीएमपीएल बंद झाली नाही पाहिजे. कारण, पुण्यात राहणारा किंवा पुण्यात कामाला येणारा जो उद्योगधंद्यात काम करतो, तो जर येऊ नाही शकला तर हे सर्व उद्योग बंद पडतील. म्हणून कंपन्यांना विनंती करावी की, तुमची वाहनसेवा सुरू करून त्याद्वारे कामगारांना घेऊन जावे किंवा कामगारांसाठी वेगळी पीएमपीएएलची व्यवस्था करा, ओळखपत्र तपासा. उगाच इकडे तिकडे फिरणार्‍यांवर बंधने आणली तर आमचे काही म्हणणे नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर जात आहे, पण अशी अनेक घरे आहेत की दिवसभर काम नाही केले तर संध्याकाळी चूल पेटत नाही. त्यांनी काय करावे? त्यांची आरोग्याची काळजी घेताना, त्यांच्या जीवनाचीदेखील काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणून पीएमपीएलच्या बाबतीत 50 टक्क्यांचा जो नियम होता तो 40 टक्क्यांवर करा, बाहेर जाणार्‍या कामगारांना प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी बापट यांनी केली.

हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यासही त्यांनी विरोध केला आहे. हॉटेल पूर्ण बंद न ठेवता, उभे राहून खाण्याची व्यवस्था ठेवावी. पार्सल सुविधा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावी. जेणेकरून बाहेरगावच्यांची उपासमार होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. शहरातील हातगाड्यांवर पाचपेक्षा अधिक लोक जमू नये, असेही बापट म्हणाले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply