Breaking News

पुजाराकडून रोहित आणि गिलची प्रशंसा

मुंबई ः प्रतिनिधी
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचे मोठे योगदान आहे. रोहित व गिलने आक्रमक खेळ करीत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो, असे पुजाराने स्पष्ट केले. पुजाराने एका मुलाखतीमध्ये भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोरदार प्रशंसा केली आहे.
 पुजाराला या मालिकेत अनेक बाऊन्सरचा सामना करावा लागला. तरीही तो भक्कमपणे खेळला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये पुजाराने तब्बल 11 बॉल शरीरावर झेलले. या वेळी त्याला अनेकदा फिजिओची मदत घ्यावी लागली. तरीही पुजाराने हार मानली नाही. संयमी खेळी करीत भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.
चेतेश्वर पुजारा 2018-19मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ‘मॅन ऑफ द सीरिज’ होता. नुकत्याच संपलेल्या मालिकेत सर्वाधिक रन करणार्‍या भारतीय बॅट्समनच्या यादीत तो दुसर्‍या क्रमांकावर होता.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply