Breaking News

पॅराग्लायडिंगचा दोर निखळून एकाचा मृत्यू

कुलू : वृत्तसंस्था

पॅराग्लायडिंग करताना दोरखंड निखळून हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा खाली आदळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायया होता, तर त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते, त्यामुळे तिने खालीच थांबायचे ठरवले. अरविंद पॅराग्लायडिंग करीत असताना हार्नेस (दोरखंड) सैल झाल्याने ते खाली आदळला आणि त्याचा मृत्यू ओढवला. या अपघातात पायलटही लँडिंग करताना गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायलटकडे फ्लाइंगचा वैध परवानादेखील नव्हता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. साहसी राइ़डच्या सुरक्षिततेवर या प्रसंगामुळे पुन्हा एकवार प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापूर्वीदेखील असे अपघात घडले आहेत. ऑपरेटर सर्टिफाइड नसतात किंवा त्यांचा नीट अभ्यास नसतो. मागील वर्षी मनाली येथील सोलांग खोर्‍यातही एका तरुणाचा पॅराग्लायडिंग करताना पडून मृत्यू झाला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply