मुरुड : प्रतिनिधी
येथील समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना झालेल्या अपघातात शनिवारी वेदांत पवार (वय 15) याचा मृत्यू तर त्याचे वडील गणेश पवार (वय 40) गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणात मुरुड पोलिसांनी पॅराशूट चालक सागर प्रदीप चौलकर यांच्यासह मुश्ताक बशीर मोडक, दिनेश धर्मा वाघमारे व मारुफ अस्लम शेख यांच्यावर भा.दं.वि.कलम 304 (अ),337,338 व 34 अन्वेय गुन्हा दाखल केला असून, त्यांना अलिबाग न्यालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper