Breaking News

पेंधर, खांदा कॉलनीत वह्यावाटप

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेंधर शाळेतील व खांदा कॉलनीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सौजन्याने आणि भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी प्रभाग क्र. 15 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग समिती ‘ब’ सभापती संजय दिनकर भोपी यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही खांदा कॉलनीतील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटप कार्यक्रम सेक्टर 8मधील दुर्गामाता मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आला. या वह्यावाटप कार्यक्रमात 325पेक्षा अधिक मुलांना 2000 वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, पनवेल शहर उपाध्यक्ष रामनाथ पाटील, भीमराव पोवार, वंदे मातरम् कामगार संघटना पनवेल तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, प्रभाग क्र. 15 अध्यक्ष शांताराम महाडिक, भाजप नेते संतोष लोटणकर, जितेंद्र माने, मच्छिंद्र वर्तक, नामदेव कोरे, महिला मोर्चाच्या प्रेमा भोपी, विजया वर्तक, पनवेल शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक भोपी, सर्व युवा मोर्चा पदाधिकारी तसेच शिवशक्ती सेवा मंडळाचे सर्व सभासद आणि सिद्धिविनायक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आदींच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले. पेंधर शाळेत वह्यावाटप करतेवेळी  पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक संतोष भोईर, डॉ. भगवान कोपरकर, सरपंच मेघनाथशेठ भोईर, माजी सरपंच दिलीप भोईर, नितीन भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोईर, रेणुका कोपरकर, दीपक पावसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा शिपूरकर व शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल पालकांनी मंडळाचे व भाजपचे आभार मानले आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply