
खोपोली : प्रतिनिधी
महिला काम करीत नाहीत, असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही. पेट्रोलपंपावर प्रामुख्याने पुरुष काम करताना आपण बघतो. मात्र आता या क्षेत्रातही महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत.
खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या ‘राम’ पेट्रोलपंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या 2 महिन्यापासून काम करीत आहेत. त्यांना 2 मुले आहेत. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मंजू कौटुंबिक जबाबदारी असल्याने रोजगार मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्याचे काम करीत आहेत. पेट्रोल पंपावर काम करणार्या त्या खालापूर तालुक्यात एकमेव महिला आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper