उरण ः वार्ताहर
उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे जगे यांच्या श्री सिद्धिविनायक कला केंद्र येथे सुप्रसिद्ध व सुबक मूर्ती आल्या असून उरण शहरात विनीत आर्ट कला केंद्र, गणपती कला केंद्र, चिन्मय कला केंद्र, रिद्धीसिद्धी कला केंद्र, लंबोदर कला केंद्र, गणेश कला केंद्र, एकदंत कला केंद्र, विघ्नहर्ता कला केंद्र व किशोर जगे यांचे श्री सिद्धिविनायक कला केंद्र आदी दुकानामध्ये पेणच्या गणेशमूर्ती विकावयास आले आहेत. आपल्या पसंतीची गणेशमूर्ती बुकिंग करताना भाविक दिसत आहेत.
पूर्वी गावोगावी मातीच्या गणपती मूर्ती बनवीत असत. आता ही पद्धत बदलली आहे. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनविणारे कारागीर मिळत नाहीत. विजेचा खेळखंडोबा, अनियमितपणा, लोडशेडिंग, मातीचे, रंगांचे वाढलेले भाव, कामगारांची कमतरता हे सर्व पाहता रेडिमेड पेणचे गणपती आणणे सर्वच जण पसंत करतात. आम्ही गेली 27 वर्षे गणेशमूर्ती आणतो. गणेश भक्तांच्या आवडीनुसार मूर्ती विविध अलंकारांनी सजविल्या जातात, असे श्री सिद्धिविनायक कला केंद्राच्या जागे यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper