पेणच्या राजकारणात चिडीचा डाव

माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा बॅनर फाडला

पेण : प्रतिनिधी

पेण पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत घेण्याचा सपाटा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी लावला आहे. या भागात रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकटकांनी फाडला आहे.

याप्रकरणी गणेश किसन धनावडे (मु. मांगरूळ) व विजय शंकर घोडींदे (कामार्ली) यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही दोघे मिळून आमच्या गावात मा. रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 15) शुभेच्छा बॅनर लावले होते. ते बॅनर त्याच रात्री काही अज्ञात समाजकटकांनी हेतूपूर्वक फाडून नुकसान केले व आमच्या भागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. या समाजकटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply