पेण : प्रतिनिधी
मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पेणमधील स्मशानभूमीत उभारलेल्या डिझेल शवदाहिनीला शुक्रवारी (दि. 14) दुपारी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नगर परिषद प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
भोगावती नदीजवळ पेण नगर परिषदेची वैकुंठधाम स्मशाभूमी आहेत. तिथे डिझेल शवदाहिनीही आहे. या शवदाहिनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन जवानांनी धाव घेत आग विझविली.
नगरपालिकेच्या जुन्या शवदाहिनीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून वायरिंग व पॅनेल जळाले आहे. या शवदाहिनीची त्वरीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. मात्र यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच नवीन शवदाहिनी उभारण्यासाठी त्वरित टेंडर्स मागविण्यात येणार आहेत.
-शिवाजी चव्हाण, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, पेण
RamPrahar – The Panvel Daily Paper