Breaking News

पेणमधील सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द

पेण : प्रतिनिधी

पेण-दिवा व रोहा-दिवा या प्रवासी मेमूसेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून इतर मागण्याबाबतीत मध्य रेल्वेने सकारात्मक भूमिका घेतल्याने मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समन्वय समिती वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी दिली.

 पेण-पनवेल इएमयू किंवा मेमू ही प्रवासी शटल सेवा तात्काळ सुरु करावी, पेण व रोहा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणूरोड ही प्रवासी रेल्वे सेवा तातडीने सुरु व्हावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांना पेण येथे थांबा मिळावा आदि मागण्यासाठी मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समन्वय समिती वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या मागण्याबाबत मध्य रेल्वेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द केले असल्याचे योगेश म्हात्रे यांनी सांगितले.

पेण स्थानकात पेण-दिवा या मेमू रेल्वे गाडीचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी योगेश म्हात्रे, निस्वार्थी प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, रेल्वेचे विजयन पिल्ले, आर. व्ही. जगताप, आरपीएफचे अशोक कहर, ए. आर. यादव, सुमित चहल आदी उपस्थित होते. या वेळी मेमू रेल्वे गाडीचे चालक अलोक खरे व रोहन शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply