पेण ः प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने रायगड एसटी प्रशासनाच्या वतीने एसटी फेर्यांमध्ये कपात करण्यात आली असून, थोड्या प्रमाणात पेण आगारातून पेण ते पनवेल, पेण ते अलिबाग अशी बससेवा सुरू होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने कोरोनाचे नियम पाळून पुन्हा एसटी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यानुसार नागरिकांचा प्रतिसाद पाहता पेणमधून तसेच अलिबाग येथून एसटी फेर्यांत वाढ करण्यात येत असून पेण ते पनवेल सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत, पनवेल ते पेण सकाळी 7.15 ते सायंकाळी 7.45 वाजेपर्यंत, अलिबाग ते पनवेल सकाळी 5.45 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पनवेल ते अलिबाग सकाळी 5.45 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा वेळापत्रकानुसार सेवा देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या प्रतिसादानुसार अलिबाग-पुणे, पुणे-अलिबाग सेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper