Breaking News

पेणमध्ये आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन

पेण : प्रतिनिधी

पुज्य आबा महाराज परांजपे यांनी स्थापन केलेल्या मंगलवन संस्थानने यंदा गुरुपौर्णिमेला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या पेण येथील साधनाश्रमात प्रवचनकार राजेंद्र पाटणकर हस्ते आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्यवाह सुगम खोपकर, त्रैमासिकाचे संपादक नंदकुमार कोरगांवकर, सहसंपादक अनंत पाटील, व्यवस्थापक रमेश पाटील, समर मोरे, रघुनाथ रसाळ, प्रकाश इंदुलकर, चंद्रकात काळे, मुग्धा घाटे यांच्यासह साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.सुवर्णमहोत्सवी वर्षातील गुरुपौर्णिमा उत्सवदेखील मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. त्याला आमदार रविशेठ पाटील, जिपच्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे व पदाधिकार्‍यांनी स्वागत केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply