पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात कोरोनाचे आणखीन आठ रुग्ण आढळले आहेत. पेण शहरातील फणसडोंगरी येथे चार व पूर्व विभागातील मांगरुळ येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा आता पेण तालुक्यातील पूर्व विभागासह पेण शहरातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले त्याचा शोध सुरू आहे. नव्या रुग्णांमुळे पेण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 झाली आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper