Breaking News

पेणमध्ये शेकापला दणका; कार्यकर्ते भाजपत दाखल

पेण : प्रतिनिधी

माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पेण पूर्व विभागातील करोटी, महलमिर्‍या डोंगर आणि चांदेपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रायगड जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, अविनाश म्हात्रे, सीताराम पाटील उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या सबका साथ, सबका विकास या कार्यपद्धतीमुळे, तसेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण, 370 कलम हटविल्याने तरुण वर्ग भाजपकडे आकर्षित होत आहे. या उलट गेल्या 10 वर्षापासून विभागात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्यामुळे पेण पूर्व भागातील शेकाप कार्यकर्त्यांनी रविशेठ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला.

रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पेण पूर्व भागातील करोटी, महलमिर्‍या डोंगर आणि चांदेपट्टी येथील रोहिदास वाघमारे, समीर वाघमारे, गणपत पवार, महेश पवार, दत्ता पवार, रामदास वाघमारे, समीर पवार, सोमनाथ पवार, दिलीप वाघमारे, महेंद्र वाघमारे, योगेश वाघमारे, अजय वाघमारे, चिंतामण वाघमारे, जयेश वाघमारे, गणेश पवार या शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात पक्षात प्रवेश केला.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply