Breaking News

पेणमध्ये 21 लाखांचा गुटखा पकडला; चालक ताब्यात

पेण ः प्रतिनिधी
अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणार्‍या आरोपीला पोलिसांनी टेम्पो व मालासह मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत पकडले. या कारवाईत 21 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा घेऊन जुन्नरमधील काटेड येथील चालक विपुल विलास चिपळ हा विक्री करण्यासाठी चालला होता. त्याचा टेम्पो 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 4च्या सुमारास खारपाडा गावाजवळ आला असता पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे बनावट पावती आढळली. या कारवाईत पोलिसांनी 21 लाख 9 हजार 980 रुपये किमतीचा माल हस्तगत केला असून आरोपीविरोधात दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply