माणगाव : प्रतिनिधी
ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेत फिल्टर प्लांट बसविला आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच सरपंच, उपसरपंच, गाव कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी आणि पेण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग निधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून पाणीपुरवठा योजनेत वॉटर फिल्टर प्लांट बसविला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विनाशुल्क शुद्ध पाणी मिळणार आहे. पाण्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने डिजिटल एटीएम कार्ड प्रत्येक घरामध्ये वाटप केले आहेत. कार्ड पंच केल्यानंतर दिवसाला एका कार्डमधून 12 लिटर पाणी मिळणार आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थ व महिला यांनी समाधान व्यक्त केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper