Breaking News

पेण तालुक्यातील रामवाडी येथे वाहनचालकांची नेत्रतपासणी

पेण : प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केयर सेंटर येथे नुकतीच पेण तालुक्यातील सुमारे 100रिक्षाचालकांसह वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. विशाल पाटील यांनी वाहनचालकांची नेत्रतपासणी केली. वाहन चालवताना डोळ्यासमोर अंधार अथवा इतर काही त्रास जाणवत असल्यास आपण तातडीने डोळ्यांची तपासणी केली पाहिजे, जेणेकरून रस्त्यावर वाहन चालवताना आपल्याला अडथळा येणार नाही, असे  डॉ. विशाल पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply