Breaking News

पेण दादर येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव साध्या पद्धतीने साजरा

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील दादर गावात विठ्ठल-रखुमाईचा उत्सव गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय नियमांचे पालन करून विठ्ठल-रखुमाईचा उत्सव मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. या वेळी भाविकांना सुंठवडा, खिचडी व केळीचा प्रसाद देण्यात आला.

या वेळी निकिता ठाकूर यांनी गेल्या वर्षी बोललेला नवस या वर्षी कु. आरव राकेश ठाकूर याची तुला फळा-फुलांनी करून विठ्ठल-रखुमाई मंदिरात पूर्ण केला. या वेळी विठ्ठल-रखुमाई मंडळाचे सदस्य हभप बाबूराव पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply