रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण

पेण : प्रतिनिधी
पेण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण बुधवारी (दि. 14) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंबेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन व म्हाडा वसाहतीमधील भगवान महावीर थीम पार्कचे लोकार्पण ना. चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. म्हाडा वसाहतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात साध्वी श्री. समकीत गुणा यांचे पालकमंत्र्यांनी आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांनी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व सर्व नगरसेवकांच्या कामाचे कौतुक केले.
नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, गटनेते अनिरूद्ध पाटील, नगर परिषदेचे बांधकाम सभापती देवता साकोस्कर, कर व शुल्क समिती सभापती सुहास पाटील, महिला बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर, पाणीपुरवठा सभापती नलिनी पवार, मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती अश्विनी शहा, मुख्याधिकारी अर्चना दिवे, माजी जि.प.सदस्य वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, उपाध्यक्ष अविनाश पोसुराम पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, कामगार आघाडीचे विनोद शहा, नगरसेवक राजेश म्हात्रे, दर्शन बाफणा, प्रशांत ओक, माजी बांधकाम सभापती मयुर कुंभार, राजेश मपारा, माजी नगरसेवक प्रकाश रामाणे, कुणाल नाईक, माजी नगरसेविका धनश्री समेळ, कन्हैय्या पुनमिया, वडखळ सरपंच राजेश मोकल यांच्यासह नागरिक या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper