Breaking News

पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर पथदिवे बसवा

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेल व पनवेलला जोडणार्‍या पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर तत्काळ विद्युत पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ’ड’ चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता इलेक्ट्रीक हाऊस सिडको कार्यालय यांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको प्राधिकरणाच्या हद्दीतील पोदी येथील नवीन बांधण्यात आलेला भुयारी मार्ग काही दिवसांपूर्वी नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला असून नवीन पनवेल व पनवेलकडे ये-जा करणार्‍या वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नसून रात्री अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेऊन या परिसरात गैरकृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन वर्दळ करताना असुरक्षितता निर्माण झालेली असून प्रवास करणार्‍या महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या नागरी प्रश्नाबाबत संबंधित खात्याने तातडीने व गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सेवा सुरू करावी व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी सभापती तेजस कांडपिळे केली आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply