Breaking News

पोर्ट महासंघाची वेतन कराराची नवी दिल्ली येथे पहिली सभा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार

अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा मंगळवारी (दि. 23)नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत झाली.

या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक तत्वे मागे घ्या, असा आवाज कामगार नेते व वेतन कराराचे सदस्य सुरेश पाटील यांनी उठविला. तसेच या मीटिंगमध्ये भारतीय मजदूर संघाने कामगारांना कॅफेटरिया मिळाला पाहिजे अशी मागणी केली. मागील वेतन करारातील कामगारांच्या हिताचे राहिलेले पेंडिंग विषयी स्थानिक व्यवस्थापनाशी चर्चा करून सोडवावेत, अशी सूचना चेअरमन यांनी केली. तसेच ज्या संघटनेला पोर्ट मध्ये ऑफिस नाही त्या संघटनेला ते ऑफिस मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.

या मीटिंगमध्ये कामगारांना बोनस लवकरात लवकर देण्याचे मान्य झाले. जेएनपीटीतील भारतीय मजदूर संघाचे वेतन कराराचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील आणि गोपी पटनायक-विशाखापट्टणम तसेच इतर महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच सर्व बंदरांचे चेअरमन उपस्थित होते. या वेतन कराराची पुढील सभा मुंबई येथे घेण्याचे निश्चित केले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply