पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील तुर्भे भागातील तीन कोटी 50 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 28) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक जनतेने जे सांगितले ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही दिलेला शब्द पाळला, असा दावा आमदार गोगावले यांनी या वेळी केला. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक-तुर्भे खोंडा नळ पाणीपुरवठा योजना, तुर्भे बुद्रुक शिवाजी चौक ते तुर्भे खोंडा रस्ता, तुर्भे बुद्रुक-शेलारवाडी रस्ता, तुर्भे बुद्रुक सभामंडप, तुर्भे बुद्रुक बौद्धवाडी संरक्षण भिंत, तुर्भे बुद्रुक गावठाण रस्ता, तुर्भे बुद्रुक येथील मंगेश गोळे यांच्या घराजवळील साकव इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, तसेच दशरथ उतेकर, संदेश कदम यांच्यासह सरपंच, उपसरपंच पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper