पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ (ता. पोलादपूर) येथील तुर्भे फाटावळणावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कन्टेनर कोसळला. बीएसएनएल सेवा खंडीत असल्याने ग्रामस्थांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला केलेला संपर्काचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तब्बल सहा तासांनंतर कन्टेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
पोलादपूरकडून महाडच्या दिशेने कन्टेनर (एमएच-46,बीबी- 8357) वेगाने चालला होता. लोहारमाळ तुर्भेफाटा येथील डायव्हर्शन रोडचा अंदाज न आल्याने कंटेनर रस्त्यालगतच्या उंचवट्यावर कलंडून कोसळला. या अपघातात कन्टेनर चालक किरकोळ जखमी झाला. या अपघाताची खबर पोलादपूर पोलीस ठाण्याला देण्यासाठी काही प्रत्यक्षदर्शीनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र टेलिफोन सेवा ठप्प असल्याने संपर्क होऊ शकला नाही. यामुळे तब्बल पाच तास संपर्काविना हा कन्टेनर याठिकाणी तसाच राहिल्याने महामार्गावरील वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper