सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारींची कामगिरी
पनवेल ः वार्ताहर
महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने आणि इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. यामुळे नवी मुंबई पोलीस दलाचे नाव सुवर्णाक्षरात नोंदविले गेले आहे. अशी कामगिरी करणारे पुजारी हे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले अधिकारी ठरले आहेत.
या स्पर्धेत जवळपास 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरोनाचे सर्व नियम पाळून स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. पुजारी यांची 20 व 21 मार्च रोजी पंजाबमधील लुधियाना येथे होणार्या मास्टर भारत श्री 2021 या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून करण्यात आली आहे.
या यशाबद्दल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विनय कारगावकर, डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शत्रुघ्न माळी आदी वरिष्ठ अधिकार्यांनी पूजारी यांचे अभिनंदन केलेे. सुभाष पुजारी हे ‘आशिया श्री’ सुनित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper