Breaking News

प्रजपिता ब्रह्माकुमारीजकडून पनवेलमध्ये वृक्षारोपण

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

महातपस्विनी दीदी प्रकाशमणी यांच्या 12व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रजपिता ब्रह्मकुमारी यांच्या विद्यमाने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकात वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (दि. 25) आयोजित करण्यात आला होता.

या वेळी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चा सरचिटणीस दर्शना भोईर, कस्टमचे निवृत्त अधिकारी शंकर बिराजदार, पत्रकार गणेश कोळी, डॉ. शुभदा नील, मंगला गडमुळे, ब्रह्माकुमारी तारादीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी तारादीदी यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले. या वेळी गुलमोहर, आंबा, चिकू अशा अनेक वृक्षांची लागवड हुतात्मा स्मारकातील बागेत करण्यात येऊन ही झाडे वाढवू, असे सर्व उपस्थितांनी अभिवचन दिले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply