पोलादपूर : प्रतिनिधी
धैर्य सामाजिक संस्थेतर्फे पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आणि फौजदारवाडी येथील प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटपकरण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात धैर्य सामाजिक संस्थेचे विवेक कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याचे महत्त्व पटवून दिले, तर सोनाली पाटील आणि रूजूला मालेकर यांनी सॅनिटरी नॅपकिनबद्दल विद्यार्थिनींना माहिती दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, सागर कदम, केंद्रप्रमुख अशोक कासार, शिक्षक ज्ञानेश्वर उतेकर, रवींद्र वाईकर, नवनाथ सोंडनवर, सहशिक्षिका संगीता धुमाळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper