पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा
रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांनी द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित पाच दिवसीय विविध स्पर्धांमध्ये फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरअखेर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशीच्या उद्घाटन रॅलीत फुंडे हायस्कूलच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे क्रीडा ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत गट क्र. 1मध्ये किशोर शिंदे याने प्रथम, तर कु. स्नेहल शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या उरण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत फुंडे हायस्कूलच्या मुलींनी मोठ्या गटात प्रथम, तर छोट्या गटात मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला. क्रीडाप्रमुख डी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांची अतिशय उत्तम तयारी करून घेतली होती. विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक ए. यू. खाडे, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, आशा मांडवकर आणि सर्व शिक्षकवृंदाने यशस्वी विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper