Breaking News

फुटपाथ, हातगाड्यांवरील फेरीवाले हटविण्यात यावे

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल येथील हातगाडी आणि फुटपाथवर अनेक भाजी व फळ विक्रेते उभे राहत असल्याने तेथे गर्दी होत आहे, कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता तेथे काही नागरीक खरेदीसाठी येतात. म्हणून हे फुटपाथवर बसणारे तसेच हातगाड्यांवर विकणार्‍या फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्तांना निवेदन दिल आहे.

नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, पनवेल या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. व संचारबंदी लागू असतानाही नवीन पनवेल येथे हातगाडी आणि फुटपाथवरील भाजी व फळ विक्रेते वाढलेले दिसून येत आहे आणि त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिस येथे भाजी व फळ विक्रेते हातगाडी व फुटपाथवर बसतात, त्यामुळे भाजी व फळ खरेदी साठी काही नागरीक गर्दी करतात.

त्या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही. आताच या फळविक्रेत्यांपैकी दोन-तीन जन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. या लोकांकडून इतर लोकांना कोरोना घेण्याची दाट शक्यता आहे. या ही बाब गांभीर्याने घेऊन नवीन पनवेल येथील फुटपाथ व हातगाड्यांवरील फेरीवाले त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply