पेण : प्रतिनिधी
रायगड फोटोग्राफर असोसिएशन या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच महाडमधील पूरग्रस्त भागात जाऊन धान्य व कपड्यांचे वाटप केले.
महाडसह बाजुच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून, शेती व घरांत पुराचे पाणी घुसून आतोनात नुकसान झाले आहे.
रायगड फोटोग्राफर असोसिएशनकडून महाडमधील 200 पुरग्रस्त कुटुंबांना धान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, सचिव समीर भायदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग अध्यक्ष समीर मालोदे, पेण अध्यक्ष समाधान पाटील, विनायक पाटील, नावेद खान, प्रकाश माळी, प्रफुल्ल म्हात्रे, मंदार पाठारे, गोविंद सांवत, नितीन पाटील, निलेश शिर्के यांच्यासह सदस्य या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper