Breaking News

बँक ऑफ इंडियाकडून निराधार महिलांना धान्यवाटप

महाड ः प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांचे रोजगाराअभावी हाल होऊ लागले आहेत. तसेच निराधार महिलांना कोणताच रोजगार नाही आणि त्यामुळे अन्नधान्यही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने पुढे येत या महिलांना आधार दिला आहे.

देशासह राज्यात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. निराधार महिलांना सरकारची तुटपुंजी पेन्शन मिळत आहे, मात्र संचारबंदीमुळे या महिलांना पैसेही काढता येत नाहीत. तसेच एकट्याने राहत असल्याने आणि सार्वजनिक वाहतूक बंदमुळे शहरात धान्य आणि किराणा खरेदीसाठी येता येत नाही. या अडचणीच्या वेळी निराधार महिलांच्या मदतीला महाडची बँक ऑफ इंडिया शाखा धावून आली आहे. मंगळवारी सकाळी बँकेच्या महाड शाखेच्या वतीने चोचिंदे, सव, मुठवली, आचळोली येथील जवळपास 60 महिलांना धान्यवाटप करण्यात आले.

या वेळी शाखेचे व्यवस्थापक विकास टाळे यांनी महाडमधील इतर बँकांनीही अशी मदत करावी, असे आवाहन केले. या वेळी चोचिंदे सरपंच अमृला सावंत, व्यवस्थापक विलास काळे, अनंत सावंत, सागर मेहतर, निलय नागदेवे, सतीश पखडावे, वैभव भोय, सचिन राक्षे, सायलघ पवार, धीरज पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply