Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचारी भरतीसाठी संप

नवेल : वार्ताहर

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या प्रमुख संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी भरतीसाठी करण्यात आला. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल येथे चारही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन कर्मचारी भरतीसाठी निदर्शने केली व बँक ग्राहकांना बँक कर्मचारी संपावर का जात आहे याची पत्रके वाटण्यात आली.

या वेळी एम्प्लॉईज फेडरेशनचे असिस्टंट सेक्रेटरी अरविंद मोरे म्हणाले की, दिवसेंदिवस बँकेचा कर्मचारी वर्ग कमी होत चालला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. बँकेत कर्मचार्‍यांची भरती करावी, ग्राहकांना चांगली ग्राहक सेवा मिळावी व बँकेची अधिक प्रगती व्हावी यासाठी हा संप करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, बँकेत कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळे त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. बँकेच्या 55 शाखांमध्ये एक ही लिपिक नाही, जवळपास 700 शाखांमध्ये शिपाई नाही. सुरक्षा कर्मचारी नाही. हंगामी कर्मचार्‍यांना गेली कित्येक वर्ष रिक्त जागेत सामावून घेतले जात नाही. बँकेत कर्मचारी भरती करणे ही काळाची गरज आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर भविष्यात संघटना अधिक तीव्र आंदोलन करील असा इशारा दिला व पुढील महिन्यात 21 व 22 ऑक्टोबरला दोन दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात येईल.

या वेळी अस्मिता गुणे, आकाश शिरवय्या, विजयकुमार पाटील, अमोल पवार, सीमा मराठे, कमलेश सराफ, नरेश यादव, माहेश्वरी नाईक, शिवाजी दळवी, सुनेत्रा परांजपे, वीरेंद्रकुमार श्रीवास्तव, अमोल भोईर, उदय कांबळे, सागर शिंदे, वामनराव गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply