पनवेल ः रामप्रहर वत्त
पाऊस यंदा जास्त काळ लांबल्याने ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर हवेत गारठा जाणवू लागला आहे. साधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थंडी पडायला सुरुवात होते व डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो, मात्र यंदा नोव्हेंबरप्रारंभी थंडी जाणवू लागल्याने बाजारात उबदार कपडे दाखल झाले असून नागरिकांची खरेदीसाठी लगबगही सुरू झाली आहे.
पनवेलच्या विविध भागांमध्ये देशभरातून आलेल्या विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याचे काम हाती घेतले आहे. या थंडीमुळे यंदा उबदार कपड्यांना अधिक मागणी राहील, अशी आशा या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी थंडी लवकर चालू झाल्याने उबदार कपड्याला मागणी वाढली आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी नव्या पद्धतीचे स्वेटर्स व जॅकेटसहित इतर उबदार कपडे बाजारात दाखल झाले आहेत. थंडी वाढल्याने जॅकेट, स्वेटर, कानटोप्या, शाल, स्वेटर्स यांची खरेदी जोर धरू लागली आहे. थंडीचा कडाका आणखी वाढण्यापूर्वीच उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
Check Also
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …
RamPrahar – The Panvel Daily Paper