जगात उद्भवलेली युद्धस्थिती आणि त्यामुळे इंधनाची दरवाढ यामुळे भारताचे आर्थिक गणित बिनसणार, असे गृहीत धरून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील पैसा काढून घेत आहेत, मात्र भारताच्या ग्रोथ स्टोरीवर ज्यांचा विश्वास आहे अशा भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारात नव्या दमाने गुंतवणूक सुरू केली आहे. या पडझडीत बाजार गुंतवणूकदारांना आणखी एक संधी देतो आहे, हे गेल्या आठवड्यातील तेजीने दाखवून दिले आहे.
रिस्क हैं तो इष्क हैं – स्कॅम 1992 या सुपरहिट वेब सिरीजमधील हर्षद मेहताचं मुख्य पात्र रंगवलेल्या प्रतीक गांधी यांच्या तोंडचं चुटपुटीत वाक्य. खरंच स्टॉक मार्केट बद्दल विचार करायला लावणारं. जणूकाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्यांना ही एक चेतावणीच होय आणि ज्यांना ही गोष्ट अंगवळणी पडलीय त्यांना खरंच शेअर मार्केटशी प्रेम आहेच फक्त ते प्रत्येक शेअर्सच्या बाबतीत बाळगून त्याजशी विवाहबंधनात अडकू नये ही माफक अपेक्षा.
असो, मागील पंधरा वीस दिवस चाललेली रशिया-युक्रेन मधील धुमश्चक्री जागतिक बाजारावर नकारात्मक परिणाम करत आपल्या बाजारातदेखील पडझड दाखवत राहिली. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले गुंतवणूकदार या प्रकारानं धास्तावून गेले, मात्र बाजारातून नक्की काय शोधायचं हे ज्यांना माहीत आहे ते उत्सुक राहिले. नकारात्मक जागतिक संकेत आणि त्यामुळं जरी सध्या परकीय गुंतवणूकदारांचा प्रचंड आऊटफ्लो दिसत असला तरी विश्लेषक गुंतवणूकदारांना या पडत्या बाजारात दर्जेदार कंपन्या निवडण्याचा सल्ला देत आहेत कारण त्यांचा विश्वास आहे की भारताची ग्रोथ स्टोरी अजूनही अबाधित आहे आणि बाजार अजूनही स्ट्रक्चरल बुल रनमध्ये आहे.
विश्लेषकांद्वारे गुणवत्तेची व्याख्या वेग-वेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते, परंतु एकमत आहे की जी कंपनी आपले भांडवल कार्यक्षमतेने वापरते आणि आपल्या भागधारकांसाठी सातत्यानं चांगला नफा कमावते ती गुणवत्ता पात्र कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते.
ह्या दोन्ही गोष्टी अनुक्रमे भांडवलावरील परतावा (RoCE) आणि इक्विटीवरील परतावा (RoE) द्वारे मोजता येतात. यां दोन्ही आर्थिक गुणोत्तरांसाठी विश्लेषक 20 टक्क्यांचा मापदंड मानतात आणि गहू भुशापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, ज्या कंपन्या वर्षानुवर्षे 20 टक्क्यांहून अधिक ठेउए आणि ठेए वितरित करत आहेत त्यांची ही कामगिरी चांगली म्हणता येईल.
आता आधी पाहूयात की विश्लेषकांचा जास्त भर याच दोन परिमाणांवर का आहे ते..
ही आर्थिक परिमाणं म्हणजे शेअरहोल्डर्सच्या भागभांडवलावरील परतावा म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी (RoE), आणि नियोजित भांडवलावरील परतावा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयीड (ROCE) ह्या गोष्टी कंपनीची कार्यक्षमता आणि परिणामी कंपनीच्या मूल्यातील भविष्यातील वाढीची संभाव्यता मोजण्यासाठी वापरली जातात आणि म्हणून त्यास जास्त मौल्यवान साधनं म्हटलं जातं. त्यामुळं कंपनीच्या आर्थिक कामगिरीचं संपूर्ण मूल्यमापन करण्यासाठी ती सहसा एकत्र वापरली जातात.
ठजए ही कंपनीच्या निव्वळ उत्पन्नाची टक्केवारी दर्शवते, कारण ती भागधारकांना मूल्य म्हणून परत केली जाते. हे सूत्र गुंतवणूकदारांना आणि विश्लेषकांना कंपनीच्या नफ्याचं पर्यायी मापन करण्याची परवानगी देते आणि भागधारकांनी गुंतवलेल्या निधीचा वापर करून कंपनी किती कार्यक्षमतेने नफा मिळवते याची गणना करते. याचं मोजमाप कंपनीचं उत्पन्न भागिले भागधारकांची इक्विटी अशाप्रकारे काढता येऊ शकतं.
ठजए भागधारकांच्या इक्विटीवर व्युत्पन्न केलेल्या नफ्याचा विचार करते, परंतु अतिरिक्त नफा मिळविण्यासाठी कंपनी उपलब्ध भांडवलाचा किती कार्यक्षमतेनं वापर करते याचे प्राथमिक उपाय म्हणजे ठजउए. इथं रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच भागधारकांच्या लागलेल्या भांडवलाबरोबरच कंपनीनं व्यवसायवृद्धीसाठी घेतलेली कर्जं देखील भांडवल म्हणून विचारात घेतलं जातं. त्यामुळं व्याज व करपूर्व उत्पन्न भागिले लावलेलं एकूण भांडवल अशा गणितानं याची टक्केवारी काढता येऊ शकते.
भांडवल-केंद्रित क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीची तुलना करताना ठजउए विशेषतः चांगलं मोजमाप देऊ शकतं, जसं की उपयुक्तता क्षेत्र आणि दूरसंचार, कारण इतर मूलभूत गोष्टींप्रमाणेच, ठजउए कर्ज आणि इतर दायित्वांचादेखील विचार करतं. त्यामुळं हे लक्षणीय कर्ज असलेल्या कंपन्यांसाठी आर्थिक कामगिरीची संकेत अधिक प्रभावीपणे मिळू शकतात.
सर्वसाधारणपणे, गुंतवणूकदार स्थिर आणि वाढत्या ठजउए असलेल्या कंपन्यांना पसंती देतात.
अलीकडच्या काही महिन्यांतील विक्रीमुळं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध अशा कांही कंपन्या ज्यांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक ठेउए आणि ठेए राखले आहे आणि ज्या आता त्यांच्या 52 आठवडी उच्चांकापासून 20-55 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध आहेत (खालील तक्ता पहा).
विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जेव्हा बाजारातील सेंटीमेंट आणखी सुधारेल तेव्हा अशा दर्जेदार कंपन्यांमधील गुंतवणुकीवर मोठा फायदा होईल.
अर्थातच हेदेखील खरं आहे, की कंपन्या निवडताना केवळ ठेए आणि ठेउए हे निर्णायक घटक असू शकत नाहीत. कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रातील बाजारहिस्सा, नावाजलेल्या उत्पादनाचं यश, कंपनी व्यवस्थापन, गुणवत्ता, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवसायाचा दृष्टीकोनदेखील सर्वोपरि आहे.
जानेवारीच्या उच्चांकापासून जवळपास 15 टक्क्यांची भाव दुरुस्ती केल्यानंतर, निफ्टीचं 1-वर्षाचं पुढील गृहीतक मूल्य आता 10 वर्षांच्या सरासरी जी 19 पट, त्याच्या खाली आहे. अनेक लार्ज कॅप ब्लू चिप कंपन्या 20-30 टक्क्यांनी खाली आल्या आहेत व वाजवी मुल्यांकनावर उपलब्ध आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी त्या आकर्षक ठरू पाहत आहेत.
खाली दिलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त पॉलीकॅब, एशियन पेंट्स, नेस्ले, अडाणी टोटल गॅस, आयटीसी, हिंदुस्थान झिंक, पिडीलाईट, डिव्हीज लॅबोरेटरी, इ. कंपन्या आहेत ज्यांचा मागील तीन वर्षांचा ठजउए 20 टक्के पेक्षा अधिक आहे. अगदी अशा प्रकारच्या संधी बाजारात सहज उपलब्ध असतात, फक्त गरज आहे जागरूकतेची व साकारात्मकतेची, पहा पटतंय का.
पडझडीनंतर सवलतीत उपलब्ध असलेल्या कंपन्या
Company Name Discount
Sigachi Industries Ltd. −55.18%
Valiant Organics Ltd. −53.48%
ChemconSpeciality −51.48%
Chemicals Ltd.
Bajaj Consumer Care Ltd. −50.08%
Tasty Bite Eatables Ltd. −48.61%
IOL Chemicals And −47.90%
Pharmaceuticals Ltd.
Lux Industries Ltd. −47.80%
Metropolis Healthcare Ltd. −45.93%
Balaxi Pharmaceuticals Ltd. −45.90%
Glenmark Life Sciences Ltd. −43.94%
Rossari Biotech Ltd. −43.42%
Astrazeneca Pharma −42.08%
India Ltd.
Nureca Ltd. −41.99%
Gulf Oil Lubricants India Ltd. −41.79%
Timescan Logistics (India) Ltd. −41.64%
Mahanagar Gas Ltd. −40.97%
DolatAlgotech Ltd. −40.62%
Computer Age Management −40.31%
Services Ltd.
– प्रसाद भावे, अर्थप्रहर
RamPrahar – The Panvel Daily Paper