Breaking News

बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने होणार साजरा

पनवेल : वार्ताहर

कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 7) विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने भाजपच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये गरीब व गरजू महिलांना विशेष मदत, स्वच्छतेचा संदेश देत कचराकुंडी वाटप, वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

बाळासाहेब पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता लिटील वर्ल्ड मॉल 4 था मजला, बॅक्वेट हॉल, खारघर येथे साजरा केला जाणार आहे. या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष व रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक, माजी मंत्री रविशेठ पाटील, महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र युवा मोर्चा प्रभारी संजय कोडगे, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, गटनेते परेश ठाकूर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांनी दिली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply