Breaking News

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी  7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, कॉलेज रायगड जिल्ह्यात असावे. खेळाडूने रहिवासी पुरावा व वयाचा पुरावा सोबत घेऊन यावा. अधिक माहितीसाठी आकाश चाकणे (9029596949) किंवा आशिष पाटणे (9029596880) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले आहे.

या निवड चाचणीतून निवडलेला संघ 17  ते 23 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होत असलेल्या 13 व 18 वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply