कर्जत : बातमीदार
तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिवंगत किसन जामघरे यांच्या स्मरणार्थ आणि सुशील कालेकर, राजेश कालेकर यांच्या पुढाकाराने बिरदोले गावातील प्राथमिक शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
दहिवली ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच किसन जामघरे यांचे मागील महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशील कालेकर आणि राजेश कालेकर यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन बिरदोले शाळेत छत्री वाटपाचा कार्यक्रम केला. या वेळी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव विष्णू कालेकर, तसेच यशवंत कालेकर, सुदाम कालेकर, रामचंद्र बागडे, हनुमान कालेकर, दामू कालेकर, पांडू कालेकर, प्रदिप कालेकर, शरद कालेकर, तानाजी कालेकर, तारामती कालेकर, आशा किशोर कालेकर, हर्षला दत्ता कालेकर यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper