Breaking News

बिहारमधील भाजपच्या यशानंतर फडणवीसांवर बंगालची जबाबदारी

कोलकाता : वृत्तसंस्था
भाजप नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दणदणीत यशानंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात फडणवीस यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचसाठी सोमवारी (दि. 21) फडणवीस पश्चिम बंगालमध्ये पोहचले आणि या ठिकाणी त्यांनी परिवर्तन यात्रेला सुरू केली.
फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, डायमंड हार्बर येथे झालेल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला. यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply