नवी मुंबई : बातमीदार
तुर्भे येथे भारतीय जनता पक्षातर्फे बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एनडीएने पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केला. या विजयाचा जल्लोष नवी मुंबईच्या भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले.
या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, मंडळ अध्यक्ष सुरेश अहिवले, दर्शन भारद्वाज, शीतल ताई, अशोक चॅटर्जी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper