Breaking News

बुस्टर पंप लावणार्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी -नेत्रा पाटील

खारघर : रामप्रहर वृत्त  : शहरातील काही सोसायट्यांमध्ये बुस्टर पंपद्वारे पाणी चोरी होत असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना याबाबत निवेदन दिले. आपल्या प्रभागातील काही सोसायट्यांमध्ये बुस्टर पंपद्वारे पाणी चोरी होते त्यामुळे बर्‍याच सोसायटीमधील रहिवाशांना योग्य तो पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे बुस्टर पंपद्वारे होणारी पाण्याची चोरी थांबावण्याची, तसेच अशा सोसायट्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे खारघरमधील विविध सेक्टरमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत, परंतु सिडकोमार्फत सदर ठिकाणी कामे होत असताना ते एका सेक्टरचे काम पूर्ण न करता अर्धवट ठेवून दुसर्‍या सेक्टरमध्ये कामाला सुरुवात करतात. अशामुळे रहिवाशांबरोबरच वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो व कामाची गुणवत्ताही राहत नाही. त्यामुळे सिडकोने संबंधित ठेकेदाराला सांगून सेक्टरनिहाय कामे पूर्ण करून घ्यावीत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत उर्वरित से. 19, 20 व 21 मधील कामे पूर्ण करावीत, असे नगरसेविका नेत्रा पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply