म्हसळा ः प्रतिनिधी
म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात नुकतीच झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, अलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर आणि अझेन कादिरी यांनी द्वितीय, तर रोहा येथील निहार आणि मुसीफ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इम्रान कादरी, मोहित मेहता, यतिन करडे, सलमान पठाण, साद काझी, अबीद, झोहेब तसेच ज्योती ढापले व टिप टॉप ग्रुप श्रीवर्धन यांनी परिश्रम घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper