Breaking News

बेकायदा नदीपात्रात कचरा टाकल्याप्रकरणी कारवाईची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

ग्रुपग्रामपंचात चावणे गावातील व परिसरातील कंपन्यांमधून जमा होणारा कचरा बेकायदा नदीपात्रात टाकत आहेत. याबाबत संदीप लहू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत परिसरातून घंटागाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जातो, पण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चावणे ग्रामपंचायत तो कचरा राजरोसपणे पाताळगंगा नदीपात्रात डम्पिंग करतात. त्यामुळे नदीपात्रात प्रदूषण होत असून, पात्र अरूंद झाल्याने पुराचा धोका वाढत आहे. याबाबत संदीप लहू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री, पनवेल तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सादर केली आहे. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी संदीप पाटील, सचिन पाटील, विलास सोनावले, नितीन देसाई यांनी केली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply