Breaking News

बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील बेलवली येथे जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) करण्यात आले. उद्घाटन समारंभाला पनवेल पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, माजी उपसरपंच के. डी. पाटील, बोर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य घनशाम पाटील, बेलवली भाजप अध्यक्ष सतिश पाटील, भिंगार ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत पाटील, काशीनाथ पाटील, संतोष पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील, दत्ता गायकर, बच्चू पवार, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply