Breaking News

बोरघाटातील शिंग्रोबा मंदिर परिसर उजळला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने वीज जोडणी

पनवेल : वार्ताहर
मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बोरघाटातील शिंग्रोबा मंदिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 21) वीज जोडणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सामाजिक लढ्यास न्याय दिल्याने शिंग्रोबा मंदिर परिसर उजळताना दिसत आहे. त्याबद्दल भाजप विमुक्त भटके आघाडीसह समस्त बहुजनवर्गाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यात येत आहेत.
मुंबई हे बेटांचे शहर. त्यावर इंग्रज पोहचले खरे, पण ते महाराष्ट्राच्या पुणे व इतर भागात दळणवळणासाठी अडकून पडले असताना या भागात असलेले मेंढपाळ शिंग्रोबा धनगर यांनी त्यांना रस्ता दाखवला. हाच तो मुंबई-पुणे रस्ता जिथून आज लोकांची वहिवाट आहे. शिंग्रोबा यांनी हे महान कार्य केले, पण त्यांना त्यासाठी बलिदान द्यावे लागले. त्यांच्या बोरघाटातील मंदिराजवळ विजेचे काम अडकून पडले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून आणि भाजप विमुक्त भटके आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागणी व पुढाकारातून हे काम पूर्णत्वास गेले आहे.
शिंग्रोबा मंदिरास वीजपुरवठा नसल्याने तेथे भेट देणार्‍या भाविकांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने या मंदिराला एक केव्ही वीज जोडणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना व महावितरण संचालक विश्वास पाठक यांना भाजप विमुक्त भटके आघाडीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर व प्रांताध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटन सरचिटणीस अशोक चोरमले, सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, महिला सरचिटणीस सुहासिनी केकाणे, कोकण विभागाचे सहसंयोजक भास्कर यमगर, युवा अध्यक्ष उमेश पाटील, उत्तर रायगड अध्यक्ष बबन बारगजे, महिला अध्यक्ष विद्या तामखडे, ईश्वर गोरे यांनी विनंती केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने ही वीज जोडणी पूर्ण झाली.
याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस, तसेच महावितरण संचलन संचालक संजय ताकसांडे, महावितरणचे रायगड ग्रामीण विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी वौयफालकर, उपअभियंता व कर्मचारीवृंद यांचे भाजप विमुक्त-भटके आघाडीच्याव वतीने आभार मानण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply