Breaking News

बोरघाटात कांद्याचा ट्रक उलटला

खालापूर ः प्रतिनिधी

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात कांदा वाहतूक करणार्‍या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने दस्तुरी येथील अवघड वळणार ट्रक पलटी झाला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून औरंगाबादहून पनवेलकडे कांदे घेऊन जाताना हा ट्रक खंडाळा येथील अमृतांजन ब्रिजजवळ तीव्र उतारावरून येताना पलटी झाला.

यात दोन जण किरकोळ जखमी झाले असून ट्रक आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. ट्रकमधील 25 टन कांदे रस्त्यावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील ट्रक बाजूला करण्यात आला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply