Breaking News

बोर्ली व कोर्लई येथील जनावरांमध्ये लॅम्पीची लक्षणे

पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत मुरूड  तहसीलदारांचे आवाहन

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील बोर्ली व कोर्लई गावातील काही जनावरांच्या अंगावर गाठी येणे अशी लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. अशी जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मुरूड तहसीलदार व पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती,  सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना पत्राद्वारे केले आहे.  बोर्ली व कोर्लई गावामध्ये लम्पीचीसदृश लक्षणे आढळल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत तातडीने उपयोजन करण्यात येत आहेत. हा रोग पसरू नये व पाळीव जनावरांचा या रोगापासून बचाव व्हावा, यासाठी तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सज्ज करण्यात आलेले आहेत. जनावरांच्या अंगावर गाठी येणे, सुरवातीस भरपूर ताप, पायावर सूज येऊन लंगडने अशी लॅम्पी रोगाची लक्षणे आहेत. हा आजार संसर्गाने पसरत असल्याने आजारी जनावरे हे निरोगी जनावरांपासून वेगळे बांधण्यात यावे, आजारी जनावरांना चार व पाण्याची वेगळी व्यवस्था करावी, जनावरांचा बाजार, प्रदर्शनी व जनावर एकत्र आणण्यास प्रतिबंध घालावा, अशा सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. लॅम्पी आजाराचा प्रसार हा डास, माशा, गोचीड, दूषित चार व पाणी इत्यादीपासून होत असल्याने गावात योग्य ती फवारणी करून घ्यावी, असे आवाहन  मुरूड  पशुसंवर्धन विभागाने केले आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरे ज्या गोठ्यात बांधली जात आहेत तिथे औषधांची फवरणी करण्याचे काम जोरात सुरू आहे.

कोर्लई व बोर्ली येथील काही जनावरांमध्ये लॅम्पी रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. या जनावरांचे रक्त नमुने विश्लेषणसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. तेथील गोठ्यांत प्रतिबंधक औषधांची फवरणी करण्यात येत आहे. लॅम्पीची लक्षणे दिसताच आपल्या पाळीव जनावरांवर नजीकच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात इलाज करून घ्यावा.

-डॉ. सुदर्शन पाडावे, पशू वैद्यकीय अधिकारी, मुरूड.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply