पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये महाशिवरात्री मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रम्हकुमारीज्च्यावतीने ‘ज्योतिर्लिंग दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रभाग समिती सभापती अॅड. वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, ब्रम्हकुमारीज पनवेलच्या संचालीका तारा दिदी, स्त्रीरोगतज्ज्ञ व गर्भसंस्कार विशेषज्ञ डॉ. शुभदा नील, भाजपचे कळंबोळी शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, भाजप नेते अॅड. जितेंद्र वाघमारे, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी, डॉ शुभदा नील यांच्या माध्यामतून दरवर्षी राबवण्यात येणार्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच पनवेल महापालिका आणि ब्रम्हकुमारीच्या वतीने बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper