नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने महिला मॅरेथॉन/वॉकेथान तसेच मनःशांती समुपदेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला नवीन पनवेल परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मधुमेहतज्ञ डॉ. कीर्ती समुद्र यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले.
तरुण महिलांसह 80 वर्षीय आजींनी सहभाग घेवून पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केले हे या स्पर्धचे प्रमुख आकर्षण ठरले. हर्षाबेन सोळंकी यांनी मनःशांती या विषयावर समुपदेशन केले.
ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचीव नृपाली जोशी, खजिनदार दिपाली जोशी यांच्यासह सभेच्या पुरुष स्वयंसेवकानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
जीवनात विविध आघाड्या सांभाळताना महिला स्वतःच्या शारिरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत जनजागृती होण्यासाठी आम्ही ही संकल्पना राबवली. स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी रोज धावण्याचा सराव करायला सुरुवात केली. हा दैनंदिन व्यायाम त्यांच्या आरोग्याला उपयुक्त ठरेल.
– दिपाली जोशी, मॅरेथॉन आयोजक
RamPrahar – The Panvel Daily Paper