Breaking News

भरकटलेल्या दोन आदिवासी मुलींचे पालक शोधण्यात मुरूड पोलिसांना यश

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील नांदगाव जेट्टी परिसरात दोन अल्पवयीन आदिवासी मुली बराचवेळ फिरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन मुरूड पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्यांच्या पालकांना शोधून काढले व त्या अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या.

नांदगाव जेट्टी परिसरात दोन आदिवासी अल्पवयीन मुली फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस नाईक विलास आंबेतकर, सुरेश वाघमारे,महिला पोलीस नाईक नीलिमा वाघमारे, शिपाई सागर रसाळ हे तातडीने या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी विचारपूस केल्यानंतर या मुलींनी आपले नाव पिंकी काशिनाथ वाघमारे (वय 8) आणि शेउ काशिनाथ वाघमारे (वय 9, रा. दोन्ही रा. आदगाव) असल्याचे सांगितले.

आदगाव हे दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे  यांनी त्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून दोन मुलींचे पालक शोधण्याची विनंती केली. दिघी पोलिसांनी या मुलींच्या आई, वडिलांना शोधले व मुरुड पोलीस ठाण्यात पाठविले. आई, वडील दिसताच मुली त्यांना बिलगल्या.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply